महाराष्ट्र शासन | GOVERNMENT OF MAHARASHTRA

आमची यशोगाथा

तवा- हे महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्हातील डहाणू तालुक्यातील नेशनल हाइवे ४८ मुंबई अहमदाबाद. चे कडेलानदया, जंगलाने बहरलेले आहे. आणि गावाला लागून सूर्या नदी आहे, सन २०११ च्या जणगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे ४६६३ आहे.

गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ८,प्राथमिक आरोग्य केंद्र १, अंगणवाडी केंद्र ८, समाजमंदिर-६  तसेच पिण्याच्या पाण्या साठी विहरी व हातपंप लघु नळ पाणी पुरवठा योजना व पाणी पुरवठा योजना अशा सुविधा उपलब्ध आहेत . तसेच साई बाबा चे  मोठे मंदिर आहे.

१.     गावातील बहुतांश लोकांची मुख्य व्यवसाय हंगामी भात, ताग, फूल शेती, तूर, उडीद, भाजीपाला ही आहेत.

२.     तवा ग्रामपंचायती मध्ये विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना बरा पैकी लाभ मिळाला आहे.

सन २०१७ आदर्श ग्रामसेवक पुरस्कार, आदर्श सरपंच पुरस्कार मिळालेले आहे.

३.  ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच व १४ सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणतात. ग्रामपंचायतीचे सर्व निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.

४.   तवा हि ग्रामपंचायत नेशनल हाइवे ४८ मुंबई अहमदाबाद च्या बाजूला असल्या कारणाने मोबाईल नेटवर्क सुविधा  उपलब्ध आहे त्यामुळे  विकासाकडे वाटचाल करत आहे.

५.   ग्रामपंचायत तवा ची सरपंच,उपसरपंचा,सदस्य यांची कमेटी एकुण १४ ची आहे

 

भौगोलिक स्थान

तवा हे गाव डहाणू तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे २४ कि.मी.अंतरावर

वसलेले आहे. गावाचे एकूण  क्षेत्र ११४७  हेक्टर  असून लागवडी खालील क्षेत्र १०७२ हेक्टर आहे.  ग्रामपंचायती मध्ये महसूल गाव ४ असून एकुण ५ वार्ड आहेत त्या मध्ये २५ पाडे समाविष्ट आहेत.एकूण ११५६ कुटुंबे येथे वास्तव्यास असून, लोकसंख्या ४६६३ आहे.त्यामध्ये २३१५ पुरुष  व २३४८ महिला यांचा समावेश आहे. गावाचा भौगोलिक विस्तार प्रामुख्याने डोगराल  प्रदेशात असून शेतीयोग्य जमीन आहे .तसेच तवा गावालगत अवघ्या १ किमी अंतरावर  तवा गावाला  पाणीपुरवठा करणारा चामदरी  नदी व सूर्या नदी  आहे. तवा, कोल्हाण, धामटणे,पेठ गावामध्ये भात, मिरची,भाजीपाला ,आबा, उत्पादनात प्रसिद्ध आहे . येथे हवामान दमट उष्णकटिबंधीय आहे; उन्हाळ्यात तापमान साधारणतः २५ ते ४४ °से. पर्यंत जाते, तर हिवाळ्यात १२ ते २५°से. पर्यंत खाली येते. येथे ग्रामपंचायत हद्दीमध्ये उन्हाळे मध्ये कवडास धरणाचे पाणी पाटामधून गावामध्ये व शेतीसाठी येते. पावसाळ्यात तवा ग्रामपंचायत  क्षेत्रातील भात उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.

लोकजीवन

           तवा  गावाचे लोकजीवन साधे, श्रमप्रधान व पारंपरिक आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून, व हंगामी भात,भाजीपाला ,तूर  पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. तसेच तवा ग्रामपंचायत मध्यवर्ती भागात असल्याने बरेच कामगार कामानिमित्त बोईसर, डहाणू, वापी, सेलवास (कासा) या ठिकाणी दररोज जात असतात. गावात आदिवासी समाजाची सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जोपासल्या जातात. वर्षभरात होणारे उत्सव, सण साजरे केले जातात.  गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्री, गावदेव तसेच स्थानिक देवतांच्या पूजांना विशेष महत्त्व आहे.

          येथील लोक मेहनती, मदतशील व अतिथि देव भव  या विचाराने वावरणारे आहेत.प्रत्येक सर्वजनिक कार्यक्रमामध्ये  स्त्रियांचा सहभाग ग्रामविकास व स्वयंसाहाय्य गटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण वर्ग शिक्षण, खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तसेच अनुसूचित जमाती/ आदिम जमाती  व इतर जमातीचे वस्ती आहे.

तवा  च्या लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीसोबतच आधुनिकतेची झलकही दिसते, ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात.

 संस्कृती परंपरा

 तवा  गावाचे सांस्कृतिक जीवन समृद्ध आणि विविधतेने नटलेले आहे. येथे वर्षभर विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.तसेच तवा,धामटणे, कोल्हाण व पेठ या  गावात गाव देवी  साथी चा कार्यक्रम वर्षातून एकदा जोरदार केला जातो त्यामुळे गावाचा एकोपा दिसून येतो . तसेच  गावातील  गावकऱ्यांचे गावदेव धार्मिक  गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, होळी यांसारखे सण गावात उत्साहाने साजरे केले जातात. या सणांमुळे गावातील मुलं, तरुण व वयोवृद्ध सर्वच वयोगट एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करतात.

         गावात लोककला, सांकृतिक कार्यक्रम,आणि पारंपरिक खेळ यांचा विशेष प्रभाव दिसून येतो. पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या परंपरा जपतानाच नवीन पिढी आधुनिकतेशी जुळवून घेते.

स्त्रियांचा सहभाग ग्रामविकासात तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतो. स्वयंसहाय्य गटांद्वारे महिला सामाजिक व आर्थिक प्रगतीत योगदान देतात. यामुळे तवा ग्रामपंचायत चे हद्दीतील सर्व लोक शेती व इतर पूरक व्यवसाय करतात. तसेच मौजे पेठ नारी शक्ती उत्तपादक महिला गट वेगवेगळे पदार्थ बनवून बाहेर गावी विक्री करतात. गावाचे लोकजीवन परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम साधत आजही एकात्मतेने टिकून आहे.

ग्रामपंचायत तवा,डहाणू

१) गावदेवी मंदिर :- गाव देव,गावदेवी मंदिर गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असून येथे दरवर्षी साथीचा धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जाते.व यात्रा भरवली जाते. २) साई बाबा मंदिर– गावाच्या मध्य भागात असलेले हे ग्रामस्थांच्या भेटीगाठींचे महत्तवाचे भेटीचे केंद्र आहे. ३) गारवा करविर रिसॉर्ट – गावाचे बाजूला रिसॉर्ट असून येथे पर्यटक येत असतात. ४) राष्ट्रीय महामार्ग लगत राजधानी हॉटेल असून तेथे उत्तम चहा, नाश्ता, जेवणाची व्यवस्था आहे. ५) सूर्या नदी तवा, धामटणे, पेठ गावा लगत वाहत जाते.

प्रशासकीय संरचना


भारतातील पंचायती राज हे ग्रामीण स्थानिक स्वराज्य प्रणालीचे प्रतीक आहे.

जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी अवश्य करा...

लोकसंख्या आकडेवारी


1156
4663
2348
2315

Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo